रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
1 minute read

पोंभूर्णा:- तालुक्यातील देवाडा खुर्द‌‌‌ येथील शेतकरी निलकंठ नैताम हे आपल्या शेतात धान पिक पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांचेवर झुडपात बसून असलेल्या रानटी डुकराने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.हि घटना मंगळवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. निलकंठ नैताम(५५) असे जखमीचे नाव आहे.

मंगळवारला सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू होता.शेतातील बांद्या पाण्याने पूर्ण भरून गेल्याने धानाचे पडे वाहून जातील या भितीने बांद्याचे खांडी फोडासाठी गेलेल्या नैताम यांचेवर शेतात काम करीत असताना झुडुपात बसून असलेल्या डुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केले.त्यांना जखमी अवस्थेत तात्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र हात व कंबर फॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे.