पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना अटक करून अहवाल सादर करा #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

पालकमंत्री मुनगंटीवार यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश
राजुरा:- राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.

घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले.

दिनांक २३ जुलै, २०२३ रोजी राजुरा, जि. चंद्रपूर येथे काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गोळीबार करून सौ. पुर्वशा सचिन डोहे यांची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात भितीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशिररित्या शस्त्र बाळगणारे, गोळीबार करणारे व समाजामध्ये भितीचे वातावरण पसरविणा-यांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. त्याअनुषंगाने सदर दुर्देवी घटनेची गांभिर्यपूर्वक नोंद घेऊन दोषींना तात्काळ अटक करावी व याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळवावा. असे निर्देश पोलिस अधीक्षकांना दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)