दोन चारचाकी वाहनासह १०० बॉक्स देशी दारू जप्त #chandrapur


स्थानिक गुन्हे शाखेने पकडला मोठ देशी दारूचा साठा
चंद्रपूर:- दिनांक 5 जुलै, 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारावरुन गजानन मंदीर वार्ड जवळील गार्डन समोरील एका घरासमोरील दोन संशयीत इसम व त्याचे ताब्यातील वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यातील एका पांढऱ्या रंगाचे डस्टर गाडी क्रमांक एम. एच. 14 डीएन 7569 मध्ये व एका पांढऱ्या रंगाचे पोलो कार क्रमांक एम एच 02 बीवाय 8154 या कारचे डिक्की व मागील सिटवर 100 खरडयाचे बॉक्स ज्यात 90 एम.एल. नी भरलेल्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीचे मिळुन आल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन नमुद दोन्ही कार व त्यातील देशी दारू असा एकुण 21,10,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला येवुन पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, प्राजल झिलपे यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत