स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये चंद्रयान-३ प्रतिकृती प्रदर्शनी

Bhairav Diwase
0

पोभूर्णा:- येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स पोभूर्णा येथे चंद्रयान-३ प्रतिकृती प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांनी चंद्रयान-३ चे प्रतिकृती बनवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.यात उत्कृष्ट तीन प्रतिकृतींना पुरस्कृत करण्यात आले.
चंद्रयान-३ प्रतिकृती स्पर्धेमध्ये समीक्षा कात्रोजवार, झुंजार चांदेकर व भावना चीप्पावार यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला. याप्रसंगी आनंदी शर्मा या विद्यार्थिनीने चंद्रयान-३ बद्दल उत्कृष्ट माहिती दिली. चंद्रयान-३ ची वैशिष्ट्ये चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर सुरक्षितपणे उतरवणे.
चंद्रावर रोव्हरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक. चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक आणि नैसर्गिक घटक, माती, पाणी इत्यादींवर वैज्ञानिक प्रयोग करणारे इन-साइट वैज्ञानिक निरीक्षण. इंटरप्लॅनेटरी म्हणजे दोन ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक हे प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक प्रा. संदीप ढोबळे यांनी विज्ञान हे मानवाला मिळालेली सर्वोत्कृष्ट देणगी आहे विद्यार्थ्यांनी विज्ञानाला एक विषय न समजता वेगवेगळे प्रयोग करावे असे मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. विकास सोनटक्के आणि प्रा. स्वाती थेरे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. संदीप ढोबळे, प्राचार्य रिजवाना शेख, प्रा. विकास सोनटक्के आणि प्रा. स्वाती थेरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य राजू खोब्रागडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)