Top News

जिल्हास्तरीय एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर ची चमू प्रथम #chandrapur #chimur


चिमूर :- एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय चंद्रपूर व रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या चमूला प्रथम पारितोषिक मिळाले.१२ ऑगस्ट "आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या " निमित्याने चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयाच्या जवळपास चौदा चमुने या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ग्रामगीता महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षक मा. सचिन भरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असणाऱ्या महाविद्यालयाच्या चमुने पथनाट्य करून प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
विशेष म्हणजे या स्पर्धेत महाविद्यालयाने पहिल्यांदा सहभागी होत पहिले पारितोषिक प्राप्त केले.

कु.कोमल डहारे, कु. साक्षी कौरासे, कु.गौरी चंदनखेडे,कु. लक्ष्मी पिंपळकर, कु.वैशाली गायकवाड,कु. सानिका बारापात्रे, कु.आरती अरके, आकाश पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या यशात उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय चिमूर च्या समुपदेशक कामिनी हलमारे यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे रेड रिबीन क्लब समन्वयक प्रा.डॉ. निलेश ठवकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बिजनकुमार शील यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने