चंद्रपूर शहरातील पहिली महिला मुर्तीकार कांता मंचलवार

Bhairav Diwase
मातीच्या मुर्तीचा कारखाना उभारण्यात यशस्वी

चंद्रपूर:- श्रीमती कांता विजय मंचलवार यांचे वडिलांकडे  मूर्ती व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय होता. लहानपणापासून मूर्ती कलेची आवड होती  विवाहा नंतर कांताबाईची सासु शिवाबाई मारोती मंचलवार हयानी सन १९८० साली शिव-पार्वती मुर्त्या १०० मुर्ती तयार केल्या परंतु त्यांना मुर्तीचे डोळे काढता नव्हते. सासूच्या माहेरी सुद्धा मूर्ती व्यवसाय होता. मंचलवार परिवारामधे हा व्यवसाय नव्हता. सासुनी कांताबाईला मुर्तीचे डोळे काढयासाठी प्रोत्साहन दिले त्यामुळे कांताबाईने सर्वप्रथम शिव-पार्वतीचा १०० मुर्त्यांचे डोळे काढले त्यामुळे त्यांची  हिंमत वाढली. १९८१ मध्ये कांताबाई होती गर्भवती होती त्यानंतर त्यांना मुलगा झाला.


 गणेशमुर्तीची संकल्पनामुळे कांताबाईने मुलाचे नाव गणेश ठेवले. मोठा मुलगा गणेश सहा महिन्या असता पासून गणेश मुर्तीच्या व्यवसायाला  सर्वप्रथम कांताबाईने सुरुवात केली. कांताबाईचे मोठे बंधु सुधाकर उत्तूरवार यांनी तिला गणेश मूर्तीचे साचे दिले त्यामुळे ती मूर्ती व्यवसायला सुरुवात झाली कांताबाईचे पती है सार्वजनिक बांधकाम विभागा शिपाई पदावर नौकरी वर होते परंतु पगार कमी  असल्याने मुर्ती व्यवसामुळे कुटुंबाला आधार मिळाला त्याच सोबत कांताबाईनी सासु सोबत माठ विकण्याचा व्यवसाय सुद्धा केला विशेष म्हणजे कांताबाई चे पतीला मुर्ती तयार करणे व रंगविता येत नव्हते, 1982 पासुन या मुर्ती व्यवसायाला सुरुवात झाली.पुढे मूर्ती  व्यवसायाचे धडे आपला पुढच्या  पिढीला देत मोठा मुलगा गणेश यांला वयाच्या 12 वर्षा पासून मुर्ती कलेचे धडे दिले. व्यवसायासोबत शिक्षणाची कास आवश्यक असल्याने मोठ्या मुलाला ड्रlईंग व पेटिंग क्षेत्राता MFA चे उच्च शिक्षण दिले. त्याचसोबत लहान मुलाला LL.B. चे शिक्षण दिले दोन्ही मुलांना मूर्तीचे संपूर्ण कामे शिकविले. त्यानंतर कांताबाई हा व्यवसाय मुलांसोबत दिवसेनदिवस वाढत गेला. सन २०१८ साली कांताबाईचा मनात कल्पना आली की  आपला मातीच्या मुर्तीचा कारखाना  असायला पहिजे. कांताबाईच्या पतीने विकत घेतलेला सन १९९८ मधील चिंचाळा येथील प्लॉटवर मूर्तीचा कारखाना तयार करण्यात यावा ही इच्छा कांताबाईने कुंटुबा समोर ठेवली सर्वाच्या सहमतीने कारखाना तयार करून सर्व प्रथम श्री गणेशाच्या १००० मूर्ती तयार करण्याचा टार्गेट ठेऊन तो पूर्ण करण्यात आला. आज कांताताबाई हा व्यवसाय  दोन मुले व सुन, नातीन नातू यांचा सोबत  करत आहे.कांताबाई चंद्रपूर शहरातील पहिली महिला आहेत ज्यांनी ५००००  मुर्ती पेशा जास्त मूर्ती तयार करण्याचा विक्रम केला आहे .