सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर :-सुरज ठाकरे यांची भूमिका नेहमीच जे जनते करिता व देशाकरिता योग्य आहे तेच करायचं व त्याकरिताच आवाज उचलायचा अशी भूमिका राहिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरज ठाकरे हे युवा स्वाभिमान पक्षाच्या नावाने कामे न करिता फक्त जय भवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामे करीत असल्यामुळे बरेच लोक संभ्रमात असायचे की सुरज ठाकरे हे गेल्या तीन वर्षापासून युवा स्वाभिमान पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असून देखील सदसस्थितीत ते फक्त त्यांच्या संघटनेच्याच माध्यमातून कामे का करत आहेत?
त्याचे एकमेव कारण म्हणजेच हे की, महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बीजेपी ची हुकूमशाही व काँग्रेस ची घराणेशाही तथा एका पक्षाची दोन गटे असलेली पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या सर्व पक्षांची महाराष्ट्रातील सत्तेत असतानाचे गलिच्छ राजकारण बघून नेमका कोणत्या पक्षावर विश्वास ठेवावा?* असा प्रश्न समोर उभा असताना जेव्हा आप पक्षानी केलेल्या विकास कामांची सत्य परिस्थिती बघून तथा आप पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याने व या पक्षाला स्थानिक पातळीवर सक्रियपणे काम करणाऱ्या नेत्याची गरज असल्याने व भविष्यात होणाऱ्या राजुरा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने व आप पक्ष हा बीजेपी तथा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा कट्टर विरोधी पक्ष असल्याकारणाने व या पक्षाची केलेली कामे पाहता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांना आप पक्षाने संधी देत आमंत्रित करताच श्री. सुरज ठाकरे यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करून काल दिनांक:- १२/ सप्टेंबर/२०२३ रोजी पुणे येथे आप पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार श्री. संजय सिंग यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. व यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामधील जिल्हाध्यक्ष कामगार तथा उपजिल्हा अध्यक्ष, जि. चंद्रपूर अशी जबाबदारी श्री. सुरज ठाकरे यांना पक्षाने देण्याचे आव्हान दिलेले आहे. यासह भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजुरा विधानसभा क्षेत्रातून श्री. सुरज ठाकरे हे आप पक्षाकडून लढणार हे निश्चित.

यासह श्री. सुरज ठाकरे यांच्या खाजगी जय भवानी कामगार संघटनेवर पक्षाचा कुठलाही परिणाम होणार नसून संघटनेचे काम देखील सुरळीत सुरू राहील असे यावेळेसचे श्री. सुरज ठाकरे यांनी सांगितले. व युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बडनेरा विधानसभा क्षेत्र श्री. रविभाऊ राणा यांनी तीन वर्ष चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून दिलेल्या जबाबदारी करिता त्यांचे श्री. सुरज ठाकरे यांनी मनापासून धन्यवाद केले. व हा पक्ष बीजेपीला समर्पित पक्ष असल्याने या पक्षाला राजीनामा देऊन श्री. सुरज ठाकरे यांनी आप पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश वेळेस श्री. सुरज ठाकरे यांचे सहकारी राजुरा येथील ब्लॅक पॅन्थर चे श्री. विजय चन्ने, आजवान टाक, अभिजित बोरकुटे आदी सहकारी देखील उपस्थित होते.
तसा पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी महाराष्ट्र सह प्रभारी श्री. गोपालजी इटालिया, प्रदेश संगठन मंत्री, श्री. भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष श्री. मयूरजी राईकवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री. योगेशजी मुर्हेकर, श्री. भिमरावजी मेंढे, श्री. स्वप्निलजी घागरगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)