Top News

फिस्कुटी शेतात मृतावस्थेत आढळला वाघ #chandrapur #pombhurna #tigerdeath


पोंभूर्णा:- वनपरिक्षेत्र पोंभूर्णा अंतर्गत येत असलेल्या नवेगाव भूजला नियत क्षेत्रातील फिस्कुटी शेतशिवारात अडीच वर्षाचा वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

वनपरिक्षेत्र पोंभूर्णा अंतर्गत येत असलेल्या भुजला नवेगाव नियत क्षेत्रातील फिस्कुटी येथील शेतकरी मनोहर वाडगुरे यांची शेती चंद्रपूर येथील रहिवासी पपलू शेंडे करीत आहेत. दि.१२ सप्टेंबर रोज मंगळवारला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान एक मजूर महिला शेतातील निंदा काढण्साठी शेतात गेली असता एक वाघ मृतावस्थेत पडून दिसला. संबंधित घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच तात्काळ वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले .वाघीणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही..मात्र सदर वाघाचा मृत्यू अपघातामुळे झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने