उड़ान ॲकडमी: प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण #Chandrapur #Article #udaan

Bhairav Diwase
0


प्रशासकीय सेवेचे ध्येय उराशी बाळगून प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण म्हणजे उड़ान ॲकडमी. या ॲकाडमीने पाच वर्षांत प्रशासकीय सेवेत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले आहे.


उड़ान ॲकडमीचे संस्थापक व आधारस्तंभ जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे हे पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. पिंपळशेंडे यांनी स्वतःच्या अडचणींना आणि समस्यांना तोंड देत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून त्यांना कळले की, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अनेक अडचणी येतात. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पाठिंबा देण्यासाठी त्यांनी उड़ान ॲकडमीची स्थापना केली.

उडान अकॅडमीने सुरुवातीला एका छोट्याशा खोलीत प्रशिक्षण सुरू केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांना मोठी रुम घेणे भाग पडले. १० जुलै २०२३ रोजी मातोश्री शाळा चौक, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे उड़ान ॲकडमीच्या नवीन रुमचे उद्घाटन झाले.
उडान अकॅडमीमध्ये प्रशासकीय सेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आणि सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी, मार्गदर्शन, मैदान सराव, 24 तास अभ्यासिका, सराव पेपर इत्यादींचा समावेश आहे.


उडान अकॅडमीच्या यशाबद्दल बोलताना पिंपळशेंडे म्हणाले, "आमचा उद्देश खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी मदत करणे हा आहे. आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 



उड़ान ॲकडमीच्या यशामुळे खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मिळाली आहे. उड़ान ॲकडमीमुळे प्रशासकीय सेवेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.

लेख:- भैरव धनराज दिवसे 

संपर्क:-
Er. Jitendra Pimpalshende sir
UDAAN THE CAREER ACADEMY CHANDRAPUR
Tukum Road Near Matoshree School Chandrapur
8806475060
8328608411

OFFICIAL ACCOUNT.....




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)