भद्रावती:- येथील संत रविदास मंडळाच्या कार्यकर्त्या , सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या व समाज उन्नतीसाठी कार्यरत सौ. सुषमा विनोद खंडाळे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल चर्मकार समाज बांधवात कौतुक केले जात आहे.
राज्यात चर्मकार समाज बांधवांची संख्या लक्षनीय मिळाले आहे. समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाची संघटना राज्यस्तरावर कार्यरत आहे . या संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष पदावर पहिल्यांदाच भद्रावती शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबातील सौ. सुषमा विनोद खंडाळे यांचे प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, विदर्भ संपर्क प्रमुख सांबा वाघमारे, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख हरीश घोरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास लांडगे, यांच्या उपस्थितीत निवड व सत्कार करण्यात आला. तसेच समाज बांधव सौ कीर्तीताई रवींद्र पवार, सरीता मेंढे, रामकृष्ण मेंढे, रवींद्र पवार , विनोद खंडाळे यांच्यासह सर्वच स्तरावरील समाज बांधवांनी सौ.सुषमा विनोद खंडाळे यांचे स्वागत केले आहे.