जि. प. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावती येथे सक्षम पॅनल चा झेंडा फडकला #chandrapur

Bhairav Diwase

भद्रावती:- स्थानिक भद्रावती येथील जि प प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था रजि.नंबर ३०७ ची संचालक मंडळ सन 2023-2028 ची निवडणूक नुकतीच संपन्न झाली.
यामध्ये महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांची संयुक्त युती तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद ,अपंग कर्मचारी संघटना ,सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर संघटना ,तथा केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना यांच्या समर्थित सक्षम पॅनलचे एकूण सहा उमेदवार निवडून आले, ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.
         

  या निवडणुकीत सक्षम पॅनलचे जगदीश ठाकरे, गंगाधर बोढे , अतुल सूर्यवंशी ,मिनाक्षी बलकी व विनोद बाळेकरमकर हे उमेदवार भरघोस मताने निवडून आले. सक्षम पॅनलच्या प्रचारावर व उमेदवारांवर विश्वास ठेवून सभासदांनी पॅनलला बहुमताने निवडून दिले.
              
   पतसंस्थेच्या कार्यालयात नुकतीच अध्यक्ष ,उपाध्यक्ष व मानद सचिव पदाची निवडणूक घेण्यात आली. या चुरशीच्या निवडणुकीत सक्षम पॅनलचे सर्व उमेदवार वरील सर्व पदावर बहुमताने निवडून आले.
           यामध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री. जगदीश सुदाम ठाकरे , उपाध्यक्ष म्हणून कु. सिंधुताई मोतीराम राठोड (सौ.मत्ते ) व मानद सचिव म्हणून श्री. विनोद पंढरी बाळेकरमकर यांची निवड श्री सुनील पांडे ,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भद्रावती यांच्या उपस्थित होऊन ,पदग्रहण सोहळा संपन्न झाला.
         यावेळी सक्षम पॅनल मधील संघटनांचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी व सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
         यानंतर सर्व नवनियुक्त अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सचिव यांच्यासोबत सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन केले.