Top News

चंद्रपुरात पावसाची हजेरी, इरई धरणाचे दोन दरवाजे उघडले #chandrapur #Erai

चंद्रपूर:- शहरात रिमझिम पाऊस सुरू असून औष्णिक वीज केंद्राच्या इरई नदीवर बांधण्यात आलेल्या इरई धरणाची २ दारे उघडण्यात आली आहेत. धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारपासून या धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत होती. यामुळे धरणाची दोन दारे अर्धा मीटरने उघडली.

सीटीपीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या गेट क्रमांक १ आणि ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणाची पाणीपातळी २०७.२५० मीटरवर गेल्यावर दरवाजे बंद करता येतील. जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस नसल्याने नागरिकांनी कशाचीही काळजी करण्याची गरज नाही, तरीही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील इरई नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने