मासे पकडताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #chandrapur


🌄
सिंदेवाही:- तालुक्यातील कच्चेपार येथील प्रफुल देविदास मेश्राम (वय २४) या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.१३ सप्टेंबर घडली. तलावात जाळे टाकत असताना प्रफुल्लचा खोल पाण्यात तोल गेला. त्यामुळे तो खोल खड्यातील पाण्यात बुडाला.
🌄

यावेळी सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती पोलीस पाटील दत्तू हटवादे यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात दिली. पोलीस उपनिरीक्षक भास्कर व्ही. ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. काही नागरिकांच्या सहकार्याने सकाळी साडेसातच्या सुमारास मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत