चंद्रपुरात 19 लाख 80 हजाराचे मॅफेड्रोन जप्त #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/ 2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असताना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहे.


सदर माहिती वरीष्ठांना देवुन सदर माहिती वरून पोलीस स्टेशन पडोली हद्दीत थांबुन असतांना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-34- बीआर-5951 ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता. ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामे शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढन्या मुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन 198 ग्राम किंमत 19,80,000/- रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखडी तलवार किंमत अंदाजे 500/- रु मिळुन आले.


सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे 1) शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर 2) साहील ईजराइल शेख वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे ताब्यातुन 1) 198 ग्रॉम एमडी पॉवडर किंमत 19,80,000/- रु 2) दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत 20,000/- रु 3 ) एक बलेनो कार एमएच-34- डीआर 5951 किंमत 8,00,000/- रू 4) आरोपीचे अंग झडतीत नगदी 2200/- रू, 5) एक लोखंडी तलवार किंमत 500/- रू असा एकुण 28.02,700/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो स्टे पडोली अप. क. 319 / 2023 कलम 8 ( क ) 21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सकलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती रिना जनबंधू याचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार, सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंग तसेच पो स्टे सायबर चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)