अखेर कंत्राटी भरतीचा GR रद्द! #Chandrapur

Bhairav Diwase
मुंबई:- राज्य सरकारने आणलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात होता. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर आज सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू केल्यामुळे त्याला तरुणांकडून तीव्र विरोध दर्शवला जात होता. तसेच, या मुद्द्यावरून राज्यातील अनेक भागात आंदोलन देखील करण्यात आली आहेत. मात्र तरी देखील राज्य सरकारने कंत्राटी भरतीचा वेग धरला होता. अखेर आज सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्यामुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे.