गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२३ परीक्षेला आजपासून सुरुवात #chandrapur #Gadchiroli #Gondwanauniversity

 

चंद्रपूर/गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२३ परीक्षेला (दि. २६) आजपासून प्रारंभ होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील असे एकूण ६७ परीक्षा केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत.‌ गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली, आल्लापल्ली, मूलचेरा, सिरोंचा, मालेवाडा ही आठ परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत