मुलीचे अश्लिल व्हिडिओ बनवले, युवकास अटक #chandrapur #Gondpipari

गोंडपिपरी:- तालुक्यात एका आरोपीने अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरणातून लैंगिक शोषण करत व्हिडिओ केला. यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंडपिपरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी शुभम चुदरी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील आरोपी शुभम चुदरी याने एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमप्रकरणातून जवळीकता साधली. प्रेम प्रकरणात फसवून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकाराचे त्याने मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलिंगद्वारे अश्लिल व्हिडिओ बनवले. यानंतर व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शुभम चुदरी (वय २०) यांच्या विरोधात गोंडपिपरी पोलिसात गुन्हा दाखल करून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत