Top News

वनमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांचा वनविभागासमोर ठिय्या आंदोलन #chandrapur #pombhurna


शेकडोच्या संख्येने कार्यालयासमोर मांडला ठिय्या; पोलिसांचा कडक बंदोबस्त

पोंभूर्णा:- पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथे आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर वनविभागाच्या विरोधात आदिवासी नेते जगन येलके यांनी शेकडो आदिवासी बांधवांना घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केला आहे. शेकडोच्या संख्येने महिला,पुरुष व चिमुकल्या मुला बाळांना घेऊन रात्री वनविभागा समोर ठिय्या मांडलेल्या आंदोलनकर्त्यांनी जो पर्यंत आमचे मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही असा पवित्रा घेतला आहे.यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.


पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथे आदिवासी संस्कृती दर्शवितांना जे पुतळे मांडण्यात आले होते ते वनविभागाने अस्ताव्यस्त टाकून त्याची विटंबना केली असून आदिवासींच्या संस्कृतीचा आराध्य असलेल्या झेंडा काढून फेकल्यामुळे सर्व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.वनविभागाकडून जी विटंबना केली जात आहे ती विटंबना आदिवासी समाज खपवून घेणार नाही या मुद्द्याला घेऊन आदिवासी बांधव पोंभूर्णा येथील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलेला आहे. अवहेलना प्रकरणी जो पर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार तो पर्यंत आम्ही वनविभागाच्या कार्यालयासमोरून हटणार नाही हा पवित्रा घेत रात्री सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू होता.

आंदोलनाचे प्रमुख मागण्या इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृतीची जी विटंबना झाली आहे ती आदिवासींचा अपमान करणारी आहे.ज्यांनी विटंबना केली आहे त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी. आदिवासींचे आराध्य सगापेन यांचा झेंडा सन्मानपूर्वक लावण्यात यावा,इको पार्कला क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे,इको पार्कचे देखरेखीचे जे कंत्राट ज्या समितीला देण्यात आले आहेत ते रद्द करण्यात यावे,वंदन विकास केंद्राला इको पार्क सांभाळण्याची जबाबदारी देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन आदिवासी बांधवांनी वनविभाग कार्यालयावर ठिय्या मांडला आहे.

यावेळी आंदोलनात महिला व चिमुकल्या मुलांचाही समावेश होता.यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारात जेवण बनवले होते.जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला होता.आंदोलनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने