Click Here...👇👇👇

रहस्यमयी घटनेनं जिल्हा हादरलं #chandrapur#gadchiroli #death #aheri

Bhairav Diwase

पती-पत्नी, २ मुलं आणि मावशी २० दिवसांत ५ जणांचा मृत्यू

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातल्या महागाव बुद्रुक या गावात कुंभारे कुटुंबातील पाच जणांचा वीस दिवसांत मृत्यू झाल्याने या प्रकरणातील गुढ वाढले आहे. एकाच कुटुंबातील आई -वडील, मुलगा- मुलगी व मावशी असे पाच जण वीस दिवसांच्या कालावधीत मृत्युमुखी पडले आहेत.

22 सप्टेंबर रोजी या कुटुंबातील विजया या 43 वर्षीय महिला डोकेदुखी व थकव्यामुळे आजारी पडल्या. त्यांचे पती शंकर त्यांनी कारद्वारे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र तेही आजारी पडले. 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे तर 27 सप्टेंबर रोजी विजया यांचा मृत्यू झाला. दरम्यान विवाहित कन्या माहेरी आली होती. तिचाही 08 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

तर दूरवर सिरोचा येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असलेला रोशन कुंभारे याचाही 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी महागाव येथे आलेल्या या कुटुंबातील मावशी आनंदा उराडे यांचाही 14 ऑक्टोबर रोजी मृत्यू झालाय. दरम्यान या सर्व मृत्यूचे कारण काय याचा शोध आरोग्य विभाग घेत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विजया आणि शंकर हे दोघेही ज्या वाहानातून रुग्णालयात दाखल झाले होते त्या वाहन चालकाचाही मृत्यू झालाय. राकेश मडावी असं मृत वाहनचालकाचं नाव आहे. अचानकपणे एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मृत्यू झाल्याने पोलिसांसह वैद्यकीय यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.