सात मोटरसायकलीसह सराईत चोरट्यास अटक #chandrapur

चंद्रपूर:- मोटार सायकल व अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरून विकणाऱ्या एका कुख्यात मोटारसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (दि.१७) ही कारवाई केली. प्रदीप संजय शेरकुरे (वय २८, रा. पारधीगुडा धोपटाळा, ता. कोरपना असे आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे यांचे पथक सोमवारी (दि.१७) ग्रस्त घालत होते. त्यावेळी कोरपना बस स्टॉप परिसरात एक व्यक्ती मोटारसायकल कमी किमतीत विकण्यासाठी आली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मोटरसायकलसह संजय शेरकुरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोटरसायकलच्या कागदपत्रांची चौकशी केली असता तो उडवा – उडवीची उत्तरे देवू लागला. त्यामुळे ही मोटरसायकल चोरीची असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानुसार सीसीटीएनएस प्रणाली व्दारे माहिती घेतली असता ती मोटारसायकल मुळ (मो. सा. क्रमांक MH-34-BC-5968) ही वरोरा पोलिस स्टेशनमध्ये चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

शेरकुरे याची अधिक कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मोटरसायकल व नारंडा गावाजवळील गुडा येथून एलईडी टीव्ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ७ मोटार सायकल व एक एलईडी टीव्ही असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मोटरसायकली वरोरा, गडचांदूर, नागपूर येथून त्याने चोरी केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या