बहुचर्चित 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? #Chandrapur #nagpur #Gadkari


'हायवे मॅन' नितीन गडकरींचे आयुष्य रुपेरी पडद्यावर

नागपूर:- केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांचे आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. लवकरच त्याचा 'गडकरी' नावाचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गडकरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये नितीन गडकरी यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
Official Teaser

'गडकरी' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बालपण, निवडणुकीचा पराभव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, जीवघेणा हल्ला, समाजकारण असा प्रवास पाहायला मिळणार आहे. नितीन गडकरी यांच्या जीवनप्रवासामधील अनेक चढ उतार आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे.

Official trailer

दिग्दर्शक अनंत भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केलं आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे. अभिनेता राहुल चोपडा यांनी नितीन गडकरी यांची आव्हानात्मक भुमिका साकारली आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे.

सक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्त्व, सडेतोड भूमिका, नव्या भारतासाठी दूरदृष्टी ठेवून धडाकेबाज निर्णय घेणारे राजकारणी नेते अशी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा टीझरही समोर आला होता. आता चाहते सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत