मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून एकाचा खून #Chandrapur #pune

पुणे:- रविवारी मध्यरात्री खुनाच्या घटनेने पुणे शहर हादरले. खडक पोलीस (Pune) स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिल साहू (वय अंदाजे 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


याप्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, (Pune) अनिल साहू हे घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्ती आले. घरात शिरून त्यांनी साहू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. हा प्रकार घडला तेव्हा साहू यांचे कुटुंबीय देखील घरात होते. गोळ्या झाडल्या नंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या साहू यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डक्टरांनी सांगितले.


दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.मध्यरात्री खुनाचा थरार, गोळ्या झाडून एकाचा खून


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत