भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचे निधन # akola

Bhairav Diwase




अकोला : अकोल्याचे ( Akola) भाजप आमदार
आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा (Gowardhan Sharma) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. वयाच्या 74 व्या वर्षी गोवर्धन शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. गोवर्धन शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.


पण उपचारादम्यान शुक्रवारी रात्री 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला. मागील अनेक दिवसांपासून राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान 04 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.