भद्रावती:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार व कार्य एकसंघ राष्ट्र निर्मिती व एकता निर्माण करणारे आहेतअसे प्रतिपादन शामराव खापणे यांनी व्यक्त केले जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 54 वी पुण्यतिथी प्रभोधन व सामुदायिक प्रार्थना करून साजरी करण्यात आली.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक नीलकंठ आत्राम उपस्थित होते. याप्रसंगी गुरुदेव भक्त
बाबाराव निखाडे प्रभाकर निमकर महादेव उरकुडे विलास खापणे बंडू परचाके अशोक खाडे, अरुण यरकाडे महादेव डोंगे विनोद सावंनकर, , सूर्यभान परचाके,पांडुरंग कोयचाडे आदी जगन्नाथ भक्त हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कोयचाडे तर आभार प्रदर्शन लिमेश माणुसमारे यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत