Click Here...👇👇👇

कु. लक्ष्मी अशोक रंदये हिला सुवर्णपदक #bhadrawati

Bhairav Diwase


भद्रावती : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु. लक्ष्मी अशोक रंदये हिने भद्रावती येथील निळकंठराव शिंदे इनडोअर स्टेडियम येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत त्वायकांडो या क्रीडा प्रकारात 17 वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले.
आता ती विभाग स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
कु. लक्ष्मीच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल ढवस सर व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कु. लक्ष्मी हिला तिचे प्रशिक्षक सतीश खेमस्कर, शिक्षक पुरुषोत्तम श्रीरामे सर व वडील अशोक रंदये ह्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.