पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आगामी काळात 31 डिसेंबर 2023 पूर्वी पोलीस भरती काढून त्यामध्ये वयवाढीचा शासन निर्णय दिनांक 3 नोव्हेंबर 2022 लागू करून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी यासाठी पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.

व्हिडिओ पहा...
https://www.instagram.com/reel/CzbX5e-v_Pi/?igshid=Y2J0b3piMzlscjNs

कोरोना काळात पोलीस होण्याची हजारो मुलांची संधी हुकली आहे. मागील 5 वर्षांपासून कारागृह तसेच बँडसमन पोलीस भरती झालेली नाही, कोरोना काळातील 2020 ते 2022 ची पोलीस शिपाई रिक्त पदे भरायची आहेत.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व मंत्रालयात मांडून मागील पोलीस भरतीमध्ये जो वयवाढीचा शासन निर्णय दि. 03 नोव्हेंबर 2022 ला लागू केला होता. तो पुढे होणाऱ्या पोलीस भरती मध्ये फक्त एक वेळेसाठी लागू करून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना एक वेळची पोलीस होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. असे निवेदन ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.

तसेच आगामी पोलिस भरतीची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी अशी चर्चा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली असता भाऊंनी या बाबत सकारात्मक चर्चा केली. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.