वर्धा नदी पात्रात तिघांचा बुडून मृत्यू #chandrapur #Ballarpur

चंद्रपूर:- वर्धा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भाजप नेते गोविंदा पोडे यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील दुपारची ही दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील व्यक्तीच्या अस्थी विसर्जनासाठी गेल्यानंतर या तिघांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोविंदा पोडे हे त्यांच्या काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गावाजवळ असलेल्या वर्धा-इरई नदीच्या संगमावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. यावेळी अस्थी विसर्जनासाठी नदीत उतरलेला त्यांचा मुलगा चेतन पोडे आणि भाचा गणेश उपरे पाण्यात बुडू लागल्याने गोविंदा पोडे यांनी नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने नदीत बुडून तिघांचाही मृत्यू झाला.

बचाव पथकाला चेतन पोडे याचा मृतदेह शोधण्यात यश आलं असून इतर दोन मृतदेहांचा शोध सुरु आहे. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत