अज्ञात अर्भकाचे निर्दयी पालक कोण? Chandrapur


आजही स्त्रीभ्रूण हत्या घडतंय

सिंदेवाही:- पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र,वासेरा क्षेत्रातील वासेरा गावात ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.वासेरा गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी जवळच लागून असलेले तलावालगत असलेली खडकाळ जागेत जवळपास पाच ते सात महिन्याचे स्त्री जातीचा अर्भक असल्याची माहिती पोलीस स्टेशनला दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोज शुक्रवारला प्राप्त झाली.त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा लगेच घटनास्थळी दाखल झाली.तेव्हा त्या ठिकाणी स्त्री जातीचं एक अर्भक मृत अवस्थेत आढळून आले.त्याचप्रमाणे घटना स्थळाचा व अर्भकाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी अर्भकाच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद खुणा आढळून आल्या नाही.त्यानंतर मृत अर्भक पुढील तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे नेण्यात आले.त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे या घटनेची नोंद करून अप.क्र.469/2023 भादवी कलम 318 अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही येथून प्रसिद्धीस प्राप्त झाली आहे.तसेच पुढिल तपास सपोनी तुषार अ. चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली पो.उप.निरीक्षक सागर महल्ले करीत आहेत.

देशात स्त्रियांचं प्रमाण कमी असल्याने शासन अनेक योजना गरोदर मातांना व पालकांना प्रोत्साहित करून ,प्रेरणादायी ठरविण्यासाठी मुलींच्या बाबतीत सन्मानजनक उपक्रम राबवित आहेत.त्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना यासारखे विविध उपक्रम एकात्मिक महिला व बाल विकास प्रकल्प,आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून विशेष सेवा दिल्या जातात. त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक व वैद्यकीय अधिकारी यांची गाव पातळीवर महत्वाची भूमिका असून आजही स्त्रीभ्रूण हत्या वासेरा गावात घडत असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे.विशेष म्हणजे महिला गरोदर असल्यावर शासकीय नोंद करण्यासाठी सुद्धा मोलाचं योगदान या संस्थाचे असते.मात्र अज्ञात गरोदर महिलेची नोंद गावातील शासकीय संस्थामध्ये कुठंही असल्याचे दिसून येत नाही.अशी चर्चा रंगत आहे.त्यामुळे ह्या अर्भकाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला व अर्भकाची दगडासारखे हृदय व विकृत मानसिकता असणारी निर्दयी पालक कोण तसेच त्यांना चुकीचा सल्ला देणारा व्यक्ती व सहाय्यक कोण अद्यापही कोड्यात आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समिती, किलबिल दत्तक संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन यांच्यासह पोलिस विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व यंत्रणांकडून नवजात अर्भकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम करण्यात येते. शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक, तसेच बेवारस ठिकाणी नवजात अर्भक सापडल्याचे प्रकारही मागील काही वर्षांत घडले आहेत.अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे सुद्धा दाखल केले आहेत.
पण समुदायात या बाबींचा जागृतीचा अभाव असल्यामुळे ह्या घटना घडत असल्याचे लक्षात येत आहे.

महत्वाचा उपदेश

नको असलेले मूल जन्माला आले तर

प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या घटनेत मूल नको असल्यास व जन्म द्यावा लागला व त्यानंतर पालनपोषण करण्यास पालक असमर्थ असल्यास संबंधितांनी त्याबाबतची माहिती हेल्पलाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच पोलिस यंत्रणेला द्यावी.यामध्ये संबंधिताचे नाव गोपनीय ठेवले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत