दत्तक गाव सरपंच संघटनेच्या आमरण उपोषणाला रक्ताने पत्र लिहून प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी दिला पाठिंबा #chandrapur #Korpana


कोरपना:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर विरोधात दत्तक गाव सरपंच संघटना व अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाचा तोडगा अजूनही निघाला नाही या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी उपोषणस्थळी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून उपोषणाला जाहिर पाठिंबा दिलेला आहे. ते म्हणाले सरपंच हा ग्रामविकासाचा कणा आहे आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये दत्तक गावातील कामे करणे कंपनीच्या सीएसआर फंड देणे बंधनकारक असल्याने सरपंचाची मागणी ही रास्त कंपनीने आंदोलन कर्त्याच्या मागण्या दोन दिवसात मान्य न केल्यास येत्या सोमावराला 20 नोव्हेंबर ला रक्तदान आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावेळेस प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष पंकज मनुसमारे सुद्धा उपस्थित होते.


स्वतंत्र भारत पक्षाचाही पाठिंबा

दत्तक गाव सरपंच संघटनेच्या या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते माजी समाजकल्याण सभापती नीलकंठ नीलकंठ कोरांगे यांनी भेट दिली. आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने यावेळी पाठिंबा जाहीर केला. यावेळी कोरपना कृषि उत्पन बाजार समितीचे संचालक शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत