शनी मंदिरात पूजा करायला गेलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्यात मृत्यू #chandrapur #tiger #tigerattack


चंद्रपूर:- शहरालगतच्या जूनोना जांगलातील शनी मंदिरात आज (दि. २०) सकाळी पूजा करायला गेलेल्या एका 53 वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोहर वाणी असे मृत्तकाचे नाव आहे. या घटनेने बाबूपेठ परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.


चंद्रपूर येथील मनोहर वाणी हे (दि. २० नोव्हेंबर ) सकाळी बाबूपेठ भागातील जुनोना जंगलातील शनी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. मंदिर परिसरात पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. दरम्यान वाणी पूजेसाठी मंदिरात प्रवेश करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. त्यानंतर मृतदेह 300 ते 400 मीटर अंतरावर ओढत नेला. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती होताच काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत