वेळ, ताकद आणि पैसा सांभाळून वापरा -ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर #jiwati


जिवती - दिवसेंदिवस येणारा काळ हा कठीण होत चाललेला आहे . बेकारी वाढत चालली आहे. महागाई दिवसेंदिवस प्रचंड वाढते आहे .निसर्ग साथ देत नाही. अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी अडकला जातोय.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही .गेल्या वर्षी सोयाबीन लोकांनी भाव वाढेल म्हणून घरात सांभाळून ठेवली. परंतु भावच मिळाला नाही. यावर्षी कापसाची अपेक्षा १०००० चे असताना सुद्धा आकडा 8000 पर्यंत ही पोहोचत नाही. खर्च वाढतोय. या विद्यमान अवस्थेत बांधवांनो आपल्या जवळील ताकद, वेळ आणि पैसा सांभाळून वापरा आणि जीवन सुखी जगा, असे मौलिक उपदेश सुप्रसिद्ध कीर्तन सम्राट हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले .ते स्वर्गीय खेमाजी पवार नाईक यांच्या 27 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पिट्टीगुडा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात बोलत होते. कीर्तन सोहळ्याचे निमंत्रकडॉ . पंकजभाऊ पवार, आयोजक दलितमित्र तुकारामजी पवार, सौ सुनिता पवार यांनी स्मृतीचिन्ह, शाल ,श्रीफळ व महाकाली मातेची प्रतिमा भेट देऊन समाज प्रबोधनकार कीर्तन सम्राट हभप निवृती महाराज यांचा सन्मान केला. यावेळी सतीसामत दादा देवस्थान वडांगळीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ,प्राचार्य शाम मोहरकर , प्रा.डॉ.राजकुमार मुसने, डॉ.धनराज खानोरकर, डॉ.परमानंद बावनकुळे, मा अशोक राठोड ,स्वप्निल पवार उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या
"आजी संसार सुफळ जाला गे माये ।
देखियले पाय विठोबाचे ॥
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळों वेळां व्हावा पांडुरंग ॥
बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा ।
निवृत्तीने तत्त्वतां सांगितले ॥" या अभंगाचा आधार घेत प्रत्येक चरणाचा अर्थ सविस्तर विश्लेषण करून उपस्थिताना मौलिक मार्गदर्शन केले. तरुणातील मोबाईलचे वेड ,व्यसनाधीनता ,प्रेम, कौटुंबिक वादविवाद यावर भाष्य करीत समाजातील भाऊबंदकी व वैरत्व यावर प्रकाश टाकला. आपल्या अनोख्या विनोदी शैलीतून आणि अंतर्मुख करणाऱ्या विचार प्रवर्तक विधानातून प्राबोधन करीत भाविकांना डोळस केले. शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करणाऱ्या तुकारामजी पवार यांचा वेलू गगनावर गेला .त्यांचे कार्य निश्चितच महान आहे असे सांगितले. भाविकांना उपदेश करतांना परमार्थामध्ये आड येणाऱ्या बारा बाबी काम, क्रोध, लोभ, मद,म
त्सर ,आशा , अहंकार , तितिक्षा याचेही सोदाहरण विश्लेषण केले. खुमासदार शैलीतून उपस्थित भाविकांना उपदेशाचे बाळकडू देत इंदोरीकर महाराजांनी अंतर्मुख केले. गायनाचार्य किरण महाराज यांच्या सुमधुर गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. संतोष एकलारे व श्री दत्त नारायण बाबा वारकरी शिक्षण संस्था धानोरा, जिल्हा आदिलाबाद येथील वारकरी उपस्थित होते. विविध खेडेगावावरून आलेल्या श्रोत्यांनी कीर्तनाचा लाभ घेतला. निमंत्रक डॉ .पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या