श्री शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.

Bhairav Diwase
0
श्री शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन.
माजी विद्यार्थी संघटनेचा पुढाकार.


राजुरा:- श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा तथा माजी विध्यार्थी संघटना द्वारा आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयिन समूह लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन दि.२३ डिसेंबर २०२३ रोज शनिवार ला सकाळी ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महाविद्यालयातील एक चमू सहभागी होता येईल. याकरिता नोंदणी शुल्क दोनशे रुपये आहे. या स्पर्धेत भारतीय परंपरेनुसार भारतीय क्षेत्रातील वेगवेगळ्या लोककला यावर नृत्य असणे अनिवार्य आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धेकाना प्रमाणपत्र देण्यात येतील. तर क्रमांकप्राप्त  स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्कार दिले जाईल.  प्रथम पुरस्कार अकरा हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ऍड. संजय धोटे, माजी आमदार व बंधू यांच्या तर्फे राहील. द्वितीय पुरस्कार आठ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र संदीप खोके, प्रक्षिक्षु विकास अधिकारी एलआयसी चंद्रपूर यांच्या तर्फे, तृतीय पुरस्कार पाच हजार रोख रक्कम सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र सौ. निकिता रमेश झाडे, सरपंच, ग्रापं.रामपूर यांच्या तर्फे, प्रोत्साहनपर तीन पुरस्कार राहील. प्रत्येकी तीन हजार रुपये रोख रक्कम रमेश नळे,माजी नगराध्यक्ष राजुरा , छावा फाउंडेशन, राजुरा व संतोष देरकर, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीयांच्या कडून देण्यात येईल. या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होण्याकरिता  प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड 9890018253, डॉ. संतोष देठे 9975344296, अविनाश दोरखंडे 9226753232, बादल बेले 8208158428, प्रा. सुयोग साळवे 8888171920, प्रा. संजय ढवस 8788312562, प्रा. विकास बल्की 9371593719, प्रा. लोकेश कुळमेथे 7507133177 यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या महाविद्यालयिन चमू ची नोंदणी त्वरित करून घ्यावी अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)