Click Here...👇👇👇

चंद्रपुरातील वढा तीर्थक्षेत्र विकासासाठी विधानभवनात शिखर समितीची बैठक #chandrapur #nagpur

Bhairav Diwase
ना .सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बैठकीचे आयोजन

नागपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील वढा येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शिखर समितीच्या बैठकीला सोमवारी (ता. १८) नागपूर येथील विधान भवनात सुरुवात झाली. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार उपस्थिती होती.

वढा तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या परिसराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार विधान भवनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.