पोलीस दलातील शिपाई पदभरती प्रक्रियेबाबत आमदार अधिवेशनात मुद्दा मांडणार का? #Chandrapur #police


पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अधिवेशनाकडे लक्ष

चंद्रपूर:- महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्याच्या उद्देशाने लाखो युवक दिवसरात्र परिश्रम घेत आहे. कोरोना महामारीच्या काळात पोलीस विभागातील शिपाई पदभरती रखडलेली होती. त्यामुळे सद्यास्थितीत गृह विभागातील अनेक पदे रिक्त आहे. सदर सर्व रिक्त पदे माहे डिसेंबर २०२३ च्या पूर्वी भरण्यात यावी. ज्यामुळे कोरोना महामारीच्या काळात वयोमर्यादा वाढलेल्या उमेदवारांना संधी प्राप्त होईल. तात्काळ पदभरती न झाल्यास सदर उमेदवारांची वयोमर्यादा वाढून पदभरती निकष शर्यतीतून बाहेर पडतील. त्यामुळे त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार होणे आवश्यक आहे.


करिता आपण महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई पदभरती २०२२-२३ प्रक्रिया तातडीने राबवावी व बायोमर्यादा वाढलेल्या अश्या उमेदवारांना पदभरती प्रक्रियेत विशेष सूट प्रदान करावी अशी विनंती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच आमदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाली असून पोलीस दलातील शिपाई पदभरती प्रक्रियेबाबत आमदार अधिवेशनात मुद्दा उपस्थित करेल का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्याच्या उद्देशाने लाखो युवक दिवसरात्र परिश्रम घेत आहे. त्यांचे लक्ष आता अधिवेशनाकडे लागले आहेत. येणाऱ्या काळात गृहमंत्री काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


खेड्यापाड्यातील होतकरू, गोरगरीब, अभ्यासू विद्यार्थ्यांची व्यथा गृहमंत्री समजून घेतील का? तसेच येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत पोलीस शिपाई पद भरतीची प्रक्रिया न राबविल्यास लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीला मिळतील ही गंभीर बाबीचा विचार माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतील का असा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात उद्भवला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या