Top News

पोलीस कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या #chandrapur #Rajura


राजुरा:- राजुरा शहरात तरुण पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव श्रीमंत कदम (वय- 32) असून ते राजुरा पोलीस स्थानकामध्ये कार्यत होते.


मयत कॉन्स्टेबल राजुरा शहरात एका भाड्याच्या घरामध्ये रहात होते. याच घरामध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपवली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने