Top News

चंद्रपूरात संतप्त शिवसैनिकांकडून विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड


चंद्रपूर:- दिवाळी लोटूनही अद्यापही पीक विमा नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळाली नाही. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान. संतप्त शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.
यंदा नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापसाचा उतारा घटला आहे. धान पीक पावसात ओला झाला.इतरही पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आणि जमीनही खरडून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, कपाशी आदी मुख्य पिकांचे सरासरी उत्पादन कमी झाले. बाजारातील भाव सुद्धा पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.

पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आंदोलन केले. सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना शासन, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा (उबाठा) शिवसेनेने दिला होता. पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अद्याप दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी सोमवारी पीक विमा कंपनीच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयात तोडफोड केली.

यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे , युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील , विनयभाऊ धोबे , सुमितभाऊ अग्रवाल , हेमराज बावणे , बाळूभाऊ भगत, बाबा साहू ,राहुलभाऊ वीरूटकर ,विकासभाऊ वीरूटकर ,सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव , शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने