चंद्रपूर:- जितेंद्र पिंपळशेंडे व इतर सहकारी यांचे स्वयंस्पष्ट निवेदन उचित व अविलंब कार्यवाही करीता आपणाकडे पाठवीत आहे. सदर निवेदनानुसार, महाराष्ट्र पोलीस दलात सेवा देण्याच्या उद्देशाने लाखो युवक दिवसरात्र परिश्रम घेत आहे. कोरोना महामारीच्या काळात पोलीस विभागातील शिपाई पदभरती रखडलेली होती. त्यामुळे सद्यास्थितीत गृह विभागातील अनेक पदे रिक्त आहे. सदर सर्व रिक्त पदे माहे डिसेंबर २०२३ च्या पूर्वी भरण्यात यावी. ज्यामुळे कोरोना महामारीच्या काळात वयोमर्यादा वाढलेल्या उमेदवारांना संधी प्राप्त होईल. तात्काळ पदभरती न झाल्यास सदर उमेदवारांची वयोमर्यादा वाढून पदभरती निकष शर्यतीतून बाहेर पडतील. त्यामुळे त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार होणे आवश्यक आहे.
Like, Comment, Share And Follow
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/reel/C0cEaIvPPKu/?igshid=MzRlODBiNWFlZA==
करिता आपण महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई पदभरती २०२२-२३ प्रक्रिया तातडीने राबवावी व बायोमर्यादा वाढलेल्या अश्या उमेदवारांना पदभरती प्रक्रियेत विशेष सूट प्रदान करावी अशी विनंती आ. किशोर जोरगेवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.