Top News

20 वर्षापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपाची नौकरी देण्यास करीत आहे टाळाटाळ #chandrapur #Korpana

आठ दिवसात नौकरी द्या अन्यथा प्रकल्पग्रस्तांना घेऊन कोणते पण आंदोलन करणार प्रहार जिल्हा प्रमुख बिडकर यांचा इशारा
कोरपना:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांना स्थायी स्वरूपाची नौकरी देण्यास टाळाटाळी करीत असून, खोटा करारनामा केला, असून अल्ट्रा टेक कंपनीने प्रकल्पग्रस्तांचा छळ केला आहे असे प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा प्रमुख बिडकर यांनी वृत्त पत्राशी बोलताना म्हंटले आहे.

अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रहार तर्फे पत्र देण्यात आले असून आठ दिवसात प्रकल्प ग्रस्तांना नौकरीवर सामावून घेण्यात यावे अशी मागणी पत्रात केली आहे यावेळी दीपक कोहचाले नितेश परचाके उपस्थित होते.

गणपत सिताराम कोहचाडे व रुपी सिताराम कोहचाडे तर्फे दिपक पुन्यवान कोहचाडे नितेश नानाजी परचाके, राह, पालगांव, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर (सर्व आदिवासी) अल्ट्राटेक सिमेंट कंपनीला दिनांक २१/०७/ २०२० ला प्रकल्पग्रस्त च्या अर्जाला अनुसरुन माहिती दिली. प्रकल्पग्रस्तांनचे शेत हे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत गेले असून प्रकल्पग्रस्तान सोबत केलेला करारनामा कंपनी पाळत नसून त्यांना नाहक शारीरीक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रकल्पग्रस्त नौकरीस इच्छुक कुटूंबातील व्यक्तींचे कागदपत्रासह प्रत्यक्ष कंपनी व्यवस्थापनाकडे संपर्क साधन्यास बोलावले होते. अर्जदार सर्व शैक्षणिक कागदपत्र प्रत्यक्ष कंपनी व्यवस्थापनाला जाऊन भेटले व अनेक वेळा भेटले. परंतु स्थायी नौकरी देवु शकत नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट म्हटले असुन न्याय हक्क डावलण्यात येत आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येत आहे. व्यवस्थापनाने जो कामाचा उल्लेख केला आहे, तो सर्वस्वी खोटा आणि दिशाभुल करून फसवणुक करणारा आहे.‌ अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीने प्रकल्पग्रस्तांना आठ दिवसात नौकरित सामावून घ्यावे अन्यथा प्रकल्पग्रस्तांना घेऊन आठ दिवसानंतर कोणते पण आंदोलन प्रहार जनशक्ती पार्टी जिल्हा प्रमुख बिडकर यांनी करण्याचा इशारा दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने