Top News

महाराष्ट्रात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचा निर्णय #chandrapur #Stategovernment


महाराष्ट्रतही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीये. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (State Government) हा निर्णय घेण्यात आलाय.


दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आलीये. सध्या संपूर्ण देशात राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटनाचा उत्साह पाहायला मिळतोय. त्याचसाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.


अयोध्येत 22 जानेवारी 2024 अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराममललांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने