Top News

क्रांतीज्योती सावित्रीबाई, फातिमा शेख, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

क्रांतीज्योती सावित्रीबाई, फातिमा शेख, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

श्री गुरुदेव सेवा मंडळा राजुराचा उपक्रम.


राजुरा:- श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा तालुका चे वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आद्यशिक्षीका फातिमा शेख, राजमाता जिजाऊ मासाहेब, स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ॲड.राजेंद्र जेनेकर केंद्रीय सदस्य प्रचार विभाग, प्रमुख अतिथी म्हणून लटारु मत्ते उपतालुकाध्यक्ष, प्रभाकर बोबाटे मुख्याध्यापक, ॲड. सारीका जेनेकर महिलाप्रमुख चंद्रपूर जिल्हा,बळीराम बोबडे आदींची उपस्थिति होती.यावेळी सामुदायिक प्रार्थनेचे महत्वावर ॲड.सारीका जेनेकर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर श्रीगुरुदेव अधिष्ठाण व प्रतिमेला शब्दसूमन अर्पण केल्यानंतर लटारु मत्ते,प्रभाकर बोबाटे,ॲड.सारिका जेनेकर यांनी समयोचित विचार व्यक्त केले.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे तालुक्यातील गावखेड्याच्या शाखांचे माध्यमातून थोरपुरुषांची जयंती व पुण्यतिथी निमित्य वेगवेगळे उपक्रम साजरे केले जातात अशा नित्य उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेल्या सेवा मंडळाचे कार्याला जनतेनी जुळावे असे विचार ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी मांडले,सुत्रसंचालन व आभार ऋषी निमकर यांनी केले, कार्यक्रमाला बहुसंख्य श्रीगुरुदेव सेवकांची उपस्थितीत होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने