Click Here...👇👇👇

वेकोलित कर्मचाऱ्याचा मृत्यू #chandrapur #Death

Bhairav Diwase

चंद्रपूर:- वेकोलिच्या घुग्घूस एक्सवेशन विभागात कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने फोरमन विजय लटारी धोबे (५८, रा. रामनगर वसाहत) यांचा बुधवारी (दि. २४) सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. विजय धोबे हे दररोजच्या पाळीनुसार बुधवारी कर्तव्यावर होते.



दरम्यान, त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने कामगारांनी वेकोलिच्या राजीव रतन केंद्रीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धोबे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी घुग्घूस येथील हिंदू समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व आप्त परिवार आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने वेकोलि हळहळ व्यक्त होत आहे.