Top News

मेहुणीसोबत दुचाकीवर स्टंटबाजी भोवली, दोघे गंभीर #chandrapur #chimur #accident

संग्रहित छायाचित्र
चिमूर:- दोन्ही हात सोडून भरधाव वेगाने दुचाकीवरून स्टंटबाजी करताना खाली कोसळल्याने युवक व युवती गंभीर जखमी झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील भिसी-वाढोणा मार्गावर मंगळवारी (दि. २३) सायंकाळी ५:३० वाजता घडली. करण रमेश रंदये (२४, शंकरपूर), त्रिवेणी बबन दडमल (२१, डोंगर्ला, ता. चिमूर) अशी जखमींची नावे आहेत.

शंकरपूर येथील रमेश रंदये हा त्याची मेहुणी त्रिवेणी दडमल हिला सोबत एम.एच. ३४, बी.एल. ८८५६ क्रमांकाच्या दुचाकीने वाढोणाकडे जात होता. दरम्यान, हा युवक दुचाकीवरून दोनही हात सोडून स्टंटबाजी करताना खाली कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

नागरिकांना माहिती मिळताच पोलिसांना कळविल्यानंतर जखमींना भिसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती अंत्यत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आले आहे. भिसीचे ठाणेदार प्रकाश राऊत हे पुढील तपास करीत आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने