पोंभूर्णा:- पोंभुर्णा येथून लक्ष्मणपूरकडे जाताना दुचाकी अपघातात किशोर रामदास थेरकर (४४ रा. देवाडा खु.), धर्मराव परशुराम आत्राम (४२, रा. लक्ष्मणपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी ५:३० वाजता आष्टा फाट्याजवळ घडली. जिल्हा रुग्णालयात दोघांवरही उपचार सूरू असताना किशोर यांना नागपूर ला हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दुचाकी अपघातात दोघे जखमी #chandrapur #pombhurna
गुरुवार, जानेवारी २५, २०२४
0