Top News

सिटीपीएस मध्ये पोलीसांचा ताफा, सगळीकडे धावाधाव #chandrapurचंद्रपूर:- चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील उर्जाभवनमध्ये दोन आतंकवादी घुसले असल्याचे सांगून बाहेरच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच धाकधूक वाढली होती. यावेळी अर्धा तास पोलीसांचे सगळीकडे धावपळ बघून कर्मचारी घाबरलेल्या अवस्थेत होते.नेमके उर्जाभवन मध्ये काय घडले हे कोणीही सांगत नव्हते त्यामुळे कर्मचाऱ्याची धाकधूक चांगलीच वाढली होती.इतकेच नव्हे तर पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी यांचा सुध्दा याठिकाणी उपस्थीती होती.

यावेळी बाॅम शोधक पथक , अग्नीशामक दल, ॲम्ब्युलन्स,गुप्तचर यंत्रणा,आदींची संपुर्ण पोलीसांचा ताफा,वरीष्ठ पोलिस अधिकारी यामुळे काही काळ उर्जाभवन परीसरात छावणीचे स्वरूप आले होते.सर्व अधिकारी गेटच्या बाहेर निघून दोन बनावटी अतिरेक्यांना पकडून पोलीस वाहनात बसवून नेण्यात आले,चौकशी नंतर पोलीसांची ही माॅकड्रिल असल्याचे कळताच कर्मचारी अभ्यागत कंत्राटदारांनी सुटकेचा श्वास सोडला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने