Top News

धाडसी महिलांनी परतवून लावला वाघाचा हल्ला #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- साक्षात वाघाला समोर पाहिल्यानंतर भल्याभल्यांची डाळ पातळ झाल्याशिवाय राहात नाही. पण बोदली गावातल्या बहाद्दर महिलांनी चक्क वाघाचा सामना करत त्याला पळवून लावून एका महिलेची त्याच्या तावडीतून सुटका केली.

ही घटना शनिवारी सकाळी घडली. मंदाबाई बंडू कोठारे असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलांनी एकजूट होऊन दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचला. tiger-women-attack

मंदाबाईसह गावातील काही महिला सरपण गोळा करण्यासाठी बोदलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामागील जंगलात गेल्या होत्या. यावेळी झुडूपात लपून बसलेल्या वाघाने मंदाबाईवर झडप घातली. पण, मंदाबाई पूर्णपणे त्याच्या तावडीत सापडण्याआधीच जवळ असलेल्या महिलांनी सावध होऊन आरडाओरड केली. त्या महिलांचा रुद्रावतार पाहून वाघाने जंगलात धूम ठोकली. यावेळी मंदाबाई जखमी झाल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने