बापरे....! चोरट्यांनी चक्क 'देवा'लाच चोरले! #Chandrapur #Gondpipari #theft

Bhairav Diwase
0


गोंडपिपरी:- तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईची मूर्ती चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दि. २५ जानेवारीला सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांचे पथक दाखल झाल्यानंतर तणाव निवळला.

भंगाराम तळोधी येथील महादेव मंदिरात एक भाविक गुरुवारी सकाळी दर्शनासाठी गेला होता. पूजा करीत असताना मंदिरातील रेणुका माता व विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीची चोरी झाल्याचे दिसून आले. त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली.

काही वेळातच मंदिर परिसरात संपूर्ण गाव एकत्र झाले. नागरिकांकडून तर्कवितर्क लावून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पीएसआय मनोहर मोगरे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)