Top News

चंद्रपूर जिल्ह्यात कोंबड बाजारावर धाड #chandrapur #chandrapurpolice


सहा अटकेत; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त


चंद्रपूर:- पायली गावालगत झुडपी जंगलात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर दुर्गापूर पोलिसांनी बुधवारी दि. २४ जानेवारीला सायंकाळ पाच वाजेच्या सुमारास धाड टाकून सहा आरोपींना अटक केली आहे. यामध्ये आठ कोंबडे, ११ दुचाकी व रोख रकमेसह एकूण आठ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पायलीलगतच्या झुडपी जंगलात कोंबड बाजार भरवून त्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. त्यावरून येथील ठाणेदार लता वाडीवे यांनी पथकासोबत धाड टाकली. यामध्ये सहा आरोपी त्यांच्या हाती लागले.घटनास्थळावरून पळून जाणाऱ्यांच्या ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. याशिवाय चार जिवंत, दोन जखमी व दोन मृत असे आठ कोंबडे असा एकूण आठ लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपींवर कलम १२ ब महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई दुर्गापूरच्या ठाणेदार लता वाडिवे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने