Top News

चंद्रपूर बाजार समितीच्या उपसभापतिपदी सुनील फरकडे #chandrapur #Ballarpur

चंद्रपूर:- कोठारी येथील सुनील फरकडे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरच्या उपसभापतीपदी अविरोध निवड झाली आहे. माजी उपसभापती गोविंदा पोडे यांच्या निधनानंतर उपसभापती पद रिक्त झाले होते. या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात फरकडे यांनी बाजी मारली आहे. फरकडे यांच्या रूपाने हा बहुमान कोठारी शहराला पहिल्यांदाच मिळाला आहे.

चंद्रपूर आणि बल्लारपूर तालुक्याचा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत समावेश आहे. १८ संचालक असलेल्या या समितीत काँग्रेस-भाजप गटाचे ११ व काँग्रेसचे ६ संचालक आहेत. सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आल्याने गंगाधर वैद्य सभापती पदावर नियुक्ती यांची झाली. भाजपचे सुनील फरकडे यांची उपसभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली आहे.

या पदासाठी २४ जानेवारीला बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. उपसभापतीपदासाठी सुनील फरकडे आणि पारस पिंपळकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र पिंपळकर यांनी नाव मागे घेतले व फरकडे यांची निवड झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने