Top News

पठाणपूरा व्यायाम शाळा द्वारा आयोजित "विजय चषक" #chandrapurचंद्रपूर:- जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा चंद्रपुर आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात पठाणपुरा व्यायाम शाळेच्या ७३ व्या वर्धापण दिनानिमित्त "विजय चषक" जिल्हास्तरीय कबड्डी सामन्याचे आयोजन दिनांक २६, २७ व २८ जानेवारी २०२४ या दरम्यान करण्यात आले आहे.

ह्या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २६ जानेवारीला २०२४ रोजी सायंकाळी ७.३० मोठ्या उत्साहात पार पडले ह्या स्पर्धे करिता खेळाडु आणि क्रीड़ा प्रेमींमधे रसिकांना अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. या दरम्यान देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला.तो सुद्धा अत्यंत उत्साहात झाला.

अमृत महोत्सवि 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीचे औचित्य साधून आजी माजी सैनिकांचा सम्मान करुन त्यांना गौरवन्यात आले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना सुद्धा सम्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विजय चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाला काल चंद्रपूर शहराचे महानगर पालिका आयुक्त विपीनजी पालीवाल, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीशजी राजपुत,सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी चहारे,सेवादलाचे अध्यक्ष सूर्यकांतजी खनके,शहर वाहतुक इंचार्ज पाटील साहेब ,जेष्ठ काँग्रेस नेते अनिलजी शिंदे, चंद्रपूर जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव प्रशांतजी करडभाजने,माजी नगरसेवक विजय आडकुजी चहारे,पठाणपुरा व्यायाम शाळे चे जेष्ठ सभासद सुरेंद्रजी पाटील,जोडदेऊळ तेली समाज मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष अरविंदजी चवरे,रामदासजी बानकर,माजी नगरसेवक राजेंद्रजी खांडेकर,शिवसेनेचे जेष्ठ नेते अजयजी वैरागडे,चिल्ड्रन्स अकॅडमीचे अध्यक्ष प्रशांतजी हजबन,राजू भाऊ चौधरी आणि जिल्ह्यातील कबड्डी संघ तसेच स्पर्धा सहभाग घेत असलेल्या अनेक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन पठाणपुरा व्यायाम शाळा चंद्रपूरयांच्या वतीने करण्यात आले

सोबतच आयोजन प्रमुख कुणाल चहारे यांच्या देखरेखित हा सोहळा संपन्न झाला.पठाणपूरा व्यायाम शाळेचे समस्त पदाधिकारी आणि खेळाडू तसेच सभासद व कार्यकर्ते यांचा सर्वांचे विशेष सहकार्य मिळाले.या सर्वांमुळे ह्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने