कोरपना:- प्रसूतीसाठी महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात त्यानंतर आले. बाळ सुखरूप झाले. मात्र प्रसूतीनंतर अवघ्या २४ तासांतच चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
प्रतिभा जयंत जेनेकर (३०) रा. कोरपना असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. कोरपना येथील प्रतिभा जेनेकर यांना प्रसूतीसाठी चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना प्रसूतीनंतर एका गोंडस कन्येला जन्म दिला. सारे काही सुखरूप असतानाच सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अचानक प्रतिभाचा चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकीकडे मुलगी झाल्याचा आनंद तर दुसरीकडे अचानक प्रसूतीनंतर अवघ्या २४ तासांतच मातेचा मृत्यू झाल्याने दुःखाचा डोंगर जेनेकर कुटुंबीयांवर कोसळला. मागील वर्षीच जयंतचा प्रतिभासोबत विवाह झाला होता. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.